पाकिस्तानात हिंदू शिक्षकाला मारहाण : मियान मिठ्ठूच्या अटकेची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका सिंध प्रांतात एका हिंदू शिक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी हा प्रकार घडला आहे. याशिवाय एका मंदिराची तोडफोडही करण्यात आली आहे. शनिवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकावर ईशनिंदेचा आरोप लावला. विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

 

धार्मिक संस्थांनी रविवारी याविरोधात बंद पुकारला होता. बऱ्याच ठिकाणी निदर्शने यावेळी करण्यात आली होती. दरम्यान यावेळी मंदिरात तोडफोड करण्यात आली आहे. निदर्शनानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलीसांकडे प्राध्यापकाच्या अटकेची मागणी केली होती. पाकिस्तानी प्रसारमाध्यामांनी केलेल्या माहितीनुसार, या प्रकारात मियॉं मिठूचा सामावेश आहे.

 

या आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांवर लाठीहल्ला सुरू केला आहे. एका व्हायरल व्हिडिओतून एका मंदिरावर आणि शाळेत तोडफोड होत असल्याचेही दिसत आहे. सिंध सरकारने अल्पसंख्यांक हिंदू समुदायाने संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, येथील पोलीसांनी परिस्थिती तणाव नियंत्रित करण्याचे प्रयत्न करत आहे.

कोण आहे मिया मिठ्ठू ?

पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचा कट्टर विरोधक मानला जाणारा मिया मिठ्ठू त्याच्या कृत्यांसाठी कृप्रसिद्ध आहे. मिया मिठू हिंदू मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतरण करवून घेतो. काही महिन्यांपूर्वीच त्याने एका महिलेचे जबरदस्ती धर्मांतरण केले होते. त्याच्याविरोधात अल्पसंख्यांकांनी वेळोवेळी निदर्शने यापूर्वीही केली आहेत. पाकिस्तानात अल्पसंख्यांक दिवस साजरा झाला. त्यावेळीही त्याला प्रखर विरोध करण्यात आला होता. मुलींचे जबरदस्ती धर्मांतरण करून तिचा निकाह एका मुस्लीम व्यक्तीशी जबरदस्तीने करून दिला जातो. मिया मिठ्ठूसारख्या नराधमांना शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

@@AUTHORINFO_V1@@