गाढवांचा बाजार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |

पाकिस्तानातील लाहोर प्रांतातील एका गावात सध्या गाढवांच्या बाजाराने धूम उडवून दिली आहे. पाकमधील काही वाहिन्यांनी या बाजाराची ब्रेकिंग न्यूज दिली आहे, तर काहींनी विशेष वृत्त म्हणून बातमी दिली आहे. सार्या वाहिन्यांचे अँकर अगदी पोट धरून हास्यकल्लोळात या बातमीचे विश्लेषण करीत आहेत. आता कुणीही म्हणेल की, असे काय विशेष आहे या गाढवांच्या बाजारात. भारतात अनेक ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. अगदी आपल्या महाराष्ट्रातही. पण, लाहोरच्या या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. कारण, या बाजारात असेही गाढव आले आहेत, ज्यांची किंमत दोन ते अडीच लाख रुपये आहे. यापैकी काहींची नावे तुम्ही ऐकली तर दंग व्हाल. कुणाचे नाव अॅटम बम, तर कुणाचे मिसाईल आहे. कुणाचे एके-47, तर कुणाचे एके-56! मादी गाढवांना मेहंदी लावून सजविण्यात आले आहे. पाकिस्तानात गाढवांची संख्या पाच लाख आहे आणि यंदा त्यात एक लाखाने वाढ झाली आहे. पाकिस्तान चीनला गाढवांची निर्यात करून कोट्यवधींचे विदेशी चलन कमावतो. तर अशी ही सारी माहिती पाकिस्तानी वाहिन्यांवर सुरू असताना, एक मोठाच गमतीदार प्रश्न बाजूच्या अँकरने महिला अँकरला विचारला, ‘‘ये गधे जुबान (भाषा) कौनसी बोलते है...’’ ती महिला अँकर खळाळून हसली आणि म्हणाली, ‘‘मुझे तो मालूम नही...’’
 
 
पाकिस्तानचे एक मंत्री आहेत शेख रशीद. हे रेल्वेमंत्री आहेत. त्यांनी अनेकदा अशी भाषा केली आहे की, ‘‘आमच्याजवळ एक किलोचा, अर्ध्या किलोचा, पाव शेराचा अगदी 50 ग्रॅमचाही बॉम्ब आहे. कोणता बॉम्ब कुठे टाकायचा हे आम्ही स्थळ पाहून टाकू...’’ आता शेख रशीद यांची ही जुबान ऐकून पाकिस्तानातील जनतेची चांगलीच करमणूक होत आहे. 1998 साली पाकिस्तानने एक अणुचाचणी करण्याचा घाट घातला. ज्या दिवशी ही चाचणी होणार होती, त्या दिवशीच तो घाबरून पाकिस्तानातून पळून गेला होता. ‘‘बम स्फोट जाता तो... म्हणून मी पाकिस्तानातून पळालो,’’ अशी कबुलीही त्याने दिली. आता त्या पाक वाहिनीच्या अँकरने ये गधे कौनसी जुबान बोलते है, असा प्रश्न सहज विचारला की, मुद्दामून विचारला, याचा सध्यातरी उलगडा झालेला नाही. पण, पाकिस्तानातील लोकांचे गाढवांच्या मंडीच्या बातम्यांनी मोठेच मनोरंजन होत आहे.
आता पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री काय म्हणतात, ते पाहू. या मंत्र्यांचे नाव आहे इजाज अहमद शाह. ते निवृत्त ब्रिगेडियर आहेत. पाकिस्तानच्या ‘हम’ वाहिनीला मुलाखत देताना ते म्हणतात, ‘‘काश्मीर प्रश्नावर आंतरराष्ट्रीय समुदाय पाकिस्तानचे काहीही ऐकायला तयार नाही. ते भारताच्या कृतीवर मात्र विश्वास ठेवत आहेत आणि त्याचे समर्थन करीत आहेत.’’ त्यांनी तर इथपर्यंत म्हटले आहे की, ‘‘सत्ताधारी एलाईट (इम्रान खान) पक्षाने संपूर्ण देशाला बरबाद करून सोडले आहे. आम्ही म्हणतो, काश्मिरात कर्फ्यू लावला आहे, तेथे औषधी मिळत नाही. पण, जग आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. उलट ते भारतावर आपला विश्वास व्यक्त करीत आहेत.’’ इजाज अहमद शाह यांनी या मुलाखतीत एक खळबळजनक आरोपही केला आहे. ‘‘पाकिस्तान सरकार जमात-उद्-दावा, र्होंीज सईद यांच्या संघटनेला कोट्यवधी रुपयांची मदत करीत आहे आणि सांगत आहे की, आम्हाला या अतिरेक्यांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. हे सर्व बंद झाले पाहिजे.’’ -इति शाह.
 
 
 
भारताच्या संसदेत ज्या वेळी 370 कलम पारित करण्यात आले, त्यानंतर लगेच इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेची संयुक्त बैठक बोलावली होती. त्यांनी त्या वेळी म्हटले होते की, आम्ही काश्मीरसाठी शेवटपर्यंत लढा देऊ. नंतर संयुक्त राष्ट्रसंघाला पाठविलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्या विधानांचा उल्लेख केला होता. कॉंग्रेसने स्पष्ट शब्दांत या कृतीचा निषेध करून काश्मीर हे भारताचेच होते, आहे आणि राहील, असा पुनरुच्चार केला होता. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी इम्रान गेले असता, तेथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. ‘‘काका मला वाचवा,’’ अशी आर्त हाक इम्रानने दिली. पण, काका काही बधले नाहीत. त्याच वेळी एका कार्यक्रमात इम्रान खान यांनी कबुली दिली होती की, पाकिस्तानात 30 ते 40 हजार अतिरेकी आहेत. अनेक मुस्लिम देशांच्या चकरा मारून ते आले. कुणीही भीक घातली नाही. उलट सहा मुस्लिम देशांनी मोदींना सर्वोच्च सन्मानाने अलंकारित केले. शेवटी इम्रानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना कबुली द्यावी लागली की, आमचे म्हणणे ऐकून घ्यायला कुणीच तयार नाही. मुस्लिम देशही नाही. कारण, त्यांचे हितसंबंध त्यात गुंतले आहेत वगैरे. नंतर इम्रानने सर्व मुस्लिम देशांतील मुसलमानांना आवाहन केले की, काश्मीरसाठी एकत्र या. अगदी भारतातील मुसलमानांना भडकावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पण, येथील मुस्लिम समुदायाने इम्रान खान यांचीच खरडपट्टी काढल्याने येथेही त्यांचे काहीच चालले नाही. आता ते काश्मिरातील, प्रामुख्याने खोर्यातील मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. जम्मू आणि लडाख हे कधीही पाकिस्तानात जायला तयार नव्हते. राहिले फक्त काश्मीर खोरे. तेथेही त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कारण, सतर्क असलेली सुरक्षायंत्रणा. तिकडे बलुचिस्तान, बाल्टिस्तान-गिलगिट, सिंध प्रांतातील लोकांनी इम्रान सरकार आणि लष्कराच्या विरोधात आवाज बुलंद केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत तर बाल्टिस्तान-गिलगिटच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानवर आरोप केला की, पाकिस्तानी लष्कर व पोलिस अनन्वित अत्याचार करीत असून, पाकिस्तानने तेथे मानवाधिकाराचा भंग चालविला आहे. बैठकस्थळाच्या बाहेर तिन्ही प्रांताच्या लोकांनी फलक हातात धरून पाकचे वाभाडे काढणारी निदर्शने केली व जगाचे लक्ष वेधले. या तिन्ही प्रांतातील लोकांची मागणी आहे की, आम्हाला भारतात राहायचे आहे, पाकिस्तानात नाही. त्यामुळे इम्रान खानची आणखी बेइज्जती होत आहे. काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपण नेऊ शकत नाही, कारण आपल्याकडे पुरावे नाहीत, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानच्या वकिलाने दिली आहे.
 
 
चोहोबाजूने इम्रान खान यांची कोंडी होत असल्याचे पाहून आता त्यांनी धाडसी खेळी खेळली आहे. अमेरिकेला बदनाम करण्यासाठी त्यांनी ‘रशिया टूडे’ या वाहिनीला मुलाखत देताना, र्अेंगाणिस्तान युद्धात पाकने अमेरिकेकडून मोठी रक्कम घेऊन जिहादींना कसे प्रशिक्षण दिले, याची कबुली दिली. 20 बिलियन डॉलर्स अमेरिकेने त्या वेळी पाकला दिले होते. यातील किती पैसा जेहादींवर खर्च झाला आणि किती नेत्यांच्या खिशात गेला, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. पण, रशियन वाहिनीचा त्यांनी उपयोग केला. आता परवा त्यांनी आपल्या आवडीच्या ‘अल् जझिरा’ या वाहिनीला मुलाखत दिली. काश्मीरच्या र्सेंेटक बातम्या देण्यासाठी इम्रानने बीबीसी आणि अल् जझिराला कोट्यवधी रुपये दिले. त्यांनी दोहोंतून अल् जझिरा निवडले. इम्रानने म्हटले आहे की, जर परंपरागत युद्ध झाले तर आम्ही पराभूत होऊ. पण, त्यानंतर एकच पर्याय उरतो. भारताला शरण जाणे किंवा अणुयुद्ध पुकारणे. आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. तिकडे र्ऐंएटीर्ऐंने पाकला आर्थिक मदत देण्याचा मुद्दा रोखून धरला आहे. इम्रान आणि त्यांच्या मंत्र्यांची वेगवेगळी विधाने पाहिल्यानंतर पाक सरकार यांच्यात एकवाक्यता नाही, याची प्रचीती यावी. धन्य तो गाढवांचा बाजार.
@@AUTHORINFO_V1@@