आजाराचे विश्लेषण भाग-२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |


 


होमियोपॅथीक तपासणीमध्ये माहिती घेत असताना रुग्ण अक्षरश: लक्षणांची, तक्रारींची यादीच चिकित्सकाला देत असतो. या सर्व यादीतील सगळीच लक्षणे महत्त्वपूर्ण नसतात. म्हणूनच चिकित्सकाला या सर्व लक्षणांमधून सर्वात महत्त्वाची लक्षणे निवडून व ती लक्षणे औषधाशी जुळवून पाहण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. या लक्षणांच्या महत्त्वावरून निवडीच्या प्रक्रियेला 'Evaluation of symptom' असे म्हटले जाते. या प्रक्रियेबद्दल डॉ. हॅनेमान यांनी काही मार्गदर्शनपर सूचना केल्या आहेत. परंतु, याशिवाय होमियोपॅथीमधील काही ऋषितुल्य चिकित्सकांनीसुद्धा यावर मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे लक्षणांचे वर्गीकरण करताना मुख्यत्वे-

 

) डॉ. हॅनेमान यांची पद्धत

) डॉ. जेम्स टायलर केंट यांची पद्धत

) डॉ. बोनिंगहुसेन व डॉ. बोगर यांची पद्धत

 

या तीन मुख्य पद्धती होमियोपॅथीमध्ये वापरल्या जातात. या तीनही पद्धतींमध्ये मूळ गाभा हा एकच असला, तरी वर्गीकरणांमध्ये थोडा बदल दिसून येतो. प्रत्येकाच्या तत्त्वज्ञानानुसार त्यांनी या लक्षणांचे वर्गीकरण केलेले आहे.

 

. डॉ. हॅनेमान यांची वर्गीकरण पद्धत

 

तसे पाहिले तर प्रत्येक वर्गीकरण पद्धतीच्या मुळाशी वैयक्तिकीकरण (Individualization) हेच असते. डॉ. हॅनेमान यांनी लक्षणांचे एकूणत्व ग्राह्य धरून खालील प्रकारे लक्षणांचे वर्गीकरण केले आहे.

 

. सर्वसाधारण लक्षणे किंवा सामान्य लक्षणे.

. असामान्य व विलक्षण व दुर्मीळ लक्षणे

 

) सर्वसाधारण लक्षणे : डॉ. हॅनेमान यांच्यानुसार आजाराची सर्वसाधारण लक्षणे जी शरीरविज्ञानाच्या अनुषंगाने स्पष्ट करून सांगता येतात. त्याचबरोबरीने अशी लक्षणे की, जी अनेक होमियोपॅथीक औषधांमध्ये आढळून येतात. अशा लक्षणांना ते सर्व 'साधारण लक्षणे' असे म्हणतात.

 

) असामान्य, विलक्षण व दुर्मीळ लक्षणे : जी लक्षणे शरीरविज्ञानाच्या निकषावर तपासता येत नाहीत, शिवाय जी लक्षणे ही आजाराची 'कॉमन' लक्षणे नसून वेगळीच असतात किंवा ज्या लक्षणांचा आजाराच्या लक्षणांशी काहीही संबंध नसतो, अशा लक्षणांना 'असामान्य लक्षणे' म्हटले जाते.

 

या प्रकरच्या लक्षणांना डॉ. हॅनेमान यांनी फार महत्त्व दिले आहे. कारण, ही लक्षणे आजारामध्ये सर्वांमध्ये दिसणारी लक्षणे नसतात, तर प्रत्येक रुग्णामध्ये त्याच्या चैतन्यशक्तीने परावर्तित केलेली किंवा चैतन्यशक्तीने निर्माण केलेली वैयक्तिक लक्षणे असतात. या लक्षणांच्या आधाराने होमियोपॅथीक औषध जर शोधले, तर हे औषध रुग्णाच्या खालावलेल्या चैतन्यशक्तीला पूर्ववत करण्याची शक्ती ठेवते. उदाहरणार्थ, साधारणपणे ताप असताना रुग्णाला फार तहान लागते किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते. ही झाली 'सर्वसाधारण लक्षणे.' परंतु, जर एखाद्या रुग्णाला तापात अजिबात तहान लागत नाही आणि एखादा रुग्ण तीव्र तापातही काही झालेच नाही, अशा आविर्भावात पूर्ण ताकदीने कार्य करत राहतो, तर ही झाली 'असामान्य लक्षणे.' साधारणत: थंड पाण्याने किंवा भिजल्याने सर्दी-पडसे होते हे झाले 'सामान्य लक्षण.' पण, जर सर्दी-पडसे थंड पाण्याने अंघोळ केल्यावर बरे होत असेल तर ते झाले 'असामान्य लक्षणे.'

 

डॉ. हॅनेमान यांचे लक्षणांचे वर्गीकरण

) सामान्य /सर्वसाधारण लक्षणे

) असामान्य विलक्षण लक्षणे

 

याच असामान्य लक्षणांमुळे होमियोपॅथीचे औषध शोधण्यास उपयोग होतो. म्हणूनच या लक्षणांचे 'Evaluation' मध्ये फार महत्त्व आहे. पुढील भागात आपण या वर्गीकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@