विश्वविक्रम ! अफगाणिस्तानने केला 'हा' रेकॉर्ड...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |




मुंबई : सध्या बांग्लादेशमध्ये तिरंगी टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेत मीरपूर येथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांग्लादेशचा २५ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तान संघाने विश्वविक्रम केला. अफगाणिस्तानच्या संघाने सलग १२ टी-२० सामने जिंकण्याची किमया केली आहे. या आधी सलग ११ सामने जिंकण्याचा विश्वविक्रमही त्यांच्याच नावावर होता.

 

अफगाणिस्ताननंतर पाकिस्तानने सलग ९ सामने जिंकले आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज अशा बलाढ्य संघांनाही हा पराक्रम करणे शक्य झालेले नाही. मात्र, अफगाणिस्तानने हा कारनामा केला आहे. तसेच, आशिया खंडात खेळण्यात आलेल्या २१ सामन्यांपैकी सर्व सामने जिंकल्याचाही विक्रम अफगाणिस्तानच्या नावे आहे.

@@AUTHORINFO_V1@@