सुगंधी फुलांतून दरळणार अगरबत्तीचा सुवास : शिर्डी साईबाबा संस्थानतर्फे अनोखा उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि उद्योजक डॉ. सुरेश हावरे यांच्या मार्गर्शनाद्वारे अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. श्री साईचरणी वाहण्यात आलेल्या फुलांचे निर्माल्य झाल्यावर त्याची सुगंधी अगरबत्ती तयार येण्याची संकल्पना यशस्वी ठरली आहे.

 

अध्यक्ष डॉ. हावरे शिर्डीतील साईबाबांच्या समाधीपाशी गेले असता दर्शनरांगेतून येणाऱ्या भाविकांनी अर्पण केलेली फुले निर्माल्य म्हणून फेकावे लागत असल्याची सल हावरे यांना लागून होती. दरम्यान त्यांना याच निर्माल्याद्वारे अगरबत्ती तयार करता येईल, अशी कल्पना सुचली. दररोज साईबाबा मंदिरात वाहिल्या जाणाऱ्या फुलांचे वजन हे दोन टन इतके आहे. तर उत्सव आणि रविवारच्या दिवशी ती संख्या चार टनांवर जाते. या निर्माल्याद्वारे अगरबत्ती तयार करण्यासाठी डॉ. हावरे यांनी अनेक संस्थांशी चर्चा सुरू केली. 'इको निर्मिती फाऊंडेशन'च्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याचे निश्चित झाले.

 

निर्माल्यातील फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करत त्यांच्या भुकटीपासून अगरबत्ती तयार करण्याचे काम ही संस्था करत आहे. ३० अगरबत्यांचे एक पाकीट अशी पाच हजार पाकिटे तयार केली जातात. या अगरबत्तीच्या विक्रीद्वारे दररोज दीड लाखांचे उत्पन्न असे पाच ते सहा कोटींचे उत्पन्नाची मिळकत आहे. त्यापैकी १० टक्के वाटा हा संस्थेला दिला जातो. एका उद्योजकाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशाप्रकारे पुढे फुलांपासून अर्क, गुलकंदही तयार केला जाणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.

 

महिलांना मिळाला रोजगार

या प्रकल्पामुळे २०० महिलांना रोजगार मिळाला आहे. मंदिरातून निर्माल्य गोळा करण्याचे काम ३० महिलांकडे सोपवण्यात आले आहे. आठवड्याचे सातही दिवस ठराविक वेळेनुसार हे काम सुरू असते. फुले उदबत्ती प्रकल्पात त्यांच्या प्रकारानुसार सर्व फुलांचे वर्गीकरण केले जाते. उर्वरित निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जाते.

@@AUTHORINFO_V1@@