अखेरीस पाकिस्तानला पराभव मान्य, पण युद्धाचा जोर कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |


इस्लामाबाद
: कलम ३७० रद्द केल्यापासून सैरभैर झालेल्या पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांसमोरही तोंडघशी पडले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडलेली असतानाही भारताला वारंवार युद्धाची धमकी देणाऱ्या पंतप्रधान इमरान खान यांनी अखेरीस आज आपला पराभव मान्य केला. भारताचे लष्करी सामर्थ्य व युद्धात होणारा पराभव मान्य असूनही इमरान खान यांची युद्ध करण्याची खुमखुमी काही कमी होत नाहीये.


पाकव्याप्त काश्मीरही पाकिस्तानच्या हातातून जाण्याची भीती असल्याने पाकिस्तान भारताला अणुयुद्ध करण्याची धमकी देत आहे. इम्रान खान यांनी भारताला २ ते ३ वेळा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. मात्र पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना इमरान खान यांनी आपला पराभव मान्य केला आहे. तसेच भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान हारेल
, परंतु याचे गंभीर परिणाम होतील. "मी अतिशय शांतताप्रिय व्यक्ती आहे. युद्धाला माझा कायमच विरोध असेल. जेव्हा दोन अण्वस्त्रधारी देशनामध्ये युद्ध होते तेव्हा ते युद्ध आण्विक होण्याची शक्यता खूप जास्ती असते. युद्धाचे वाईट परिणाम मी जाणतो. आणि भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान हारेल. अशावेळी एकतर आम्ही आत्मसमर्पण करू किंवा शेवटच्या श्वासापर्यंत लढू", असे इमरान खान यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. तसेच हे युद्ध झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भारतीय उपखंडावर होतील अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.

@@AUTHORINFO_V1@@