आंध्रप्रदेशात बोट उलटून ११ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |




आंध्रप्रदेश
:
आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत रविवारी पर्यटकांना घेऊन जाणारी बोट पलटी झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीतून ६१ लोक प्रवास करत होते. त्यापैकी १२ जणांना वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. एनडीआरएफच्या २ तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.


आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एपीएसडीएमए) म्हटले आहे की
, 'पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपटनाममधील गोदावरी नदीत ६१ जणांना घेऊन जाणारी पर्यटक बोट उलटल्याने आज ११ जणांचा बळी गेला आहे. इतरांचा शोध सुरू आहे . सुमारे 23 जणांना सुखरूप वाचविण्यात आले आहे. ही बातमी पसरताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन संघटना बचाव कार्यासाठी तातडीने दाखल करण्यात आले. ४० सदस्यांसह दोन एसडीआरएफ टीमही घटनास्थळी पोहोचल्या.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.


नदीतील पुराचे पाणी कमी झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी नदीत नौकाविहार करण्यास परवानगी दिली आहे.
'रॉयल ​​वसिस्टा' या बोटमध्ये प्रवासी गंडी पोचम्मा मंदिरातून पापीकॉंडलूकडे जात असताना ही दुर्घटना घडली. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि पाटबंधारे व महसूल विभागांचे अन्य शासकीय अधिकारीही पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवीपानम हद्दीतील दुर्घटनास्थळी दाखल झाले.

@@AUTHORINFO_V1@@