लोकमान्य सेवा संघात शुक्रवारी अश्विनी भिडे यांचे व्याख्यान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |





‘मेट्रोची गरज-शाश्वत विकास’ या विषयावर मांडणार आपले मत

 

मुंबई : शहरातील विलेपार्ले येथील प्रसिद्ध आणि नामवंत लोकमान्य सेवा संघाच्या वतीने येत्या शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मेट्रोची गरज-शाश्वत विकास’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार असून यावेळी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे उपस्थित असणार आहेत.

 

लोकमान्य सेवा संघातील पु. ल. देशपांडे सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता हे व्याख्यान पार पडणार असून यावेळी संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. प्रस्तावित मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडवरून ‘आरे’ चा मुद्दा सर्वत्र चर्चेत आहे. त्यामुळे आपल्या व्याख्यानात अश्विनी भिडे या ‘मेट्रोची गरज-शाश्वत विकास’ या विषयावर नेमकी कोणती मते मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी अधिकाधिक नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमान्य सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ‘दै. मुंबई तरुण भारत’ माध्यम प्रायोजक आहे.
@@AUTHORINFO_V1@@