आरे ही वनजमीन नाही ! आदित्य ठाकरेंशी स्वत: चर्चा करेन - मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Sep-2019
Total Views |


 
 

पुणे : गोरेगावच्या आरे वसाहतीत प्रस्तावित असणाऱ्या 'मेट्रो-३'च्या कारशेडबाबत आदित्य ठाकरे यांनी तथ्य समजून घ्यावीत, त्यासाठी मी स्वत: त्यांच्याशी चर्चा करेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाजनादेश यात्रेअंतर्गत मुख्यमंत्री रविवारी सकाळी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. आदित्य ठाकरे यांचे झाडांप्रती असलेले विचार चांगले आहेत. परंतु विरोध करणाऱ्यांमधील काहींच्या मनात नेमके काय दडलेले आहे हे ठाकरे यांनी समजून घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कारशेडला विरोध दर्शविला होता.

 

आरेमध्ये नियोजित करण्यात आलेल्या 'मेट्रो-३'च्या कारशेडला आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. या जमिनीवरील एकही झाड आपण कापू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जैवविविधतेचा मुद्दा अधोरेखित करुन कारशेडला विरोध दर्शविला होता. ठाकरेंच्या या विरोधी भूमिकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, आपण आदित्य यांच्याशी चर्चा करुन या प्रकल्पांबाबत संपूर्ण माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी झाडांची कत्तल आम्हालाही मान्य नसून फक्त झाडे कापण्य़ामागे असलेली तथ्य समजून घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

 

सर्वोच्च न्यायालयानुसार आरेमधील प्रस्तावित कारशेडची जमीन ही वनजमीन नाही. ही जमीन सरकारी मालकीची असल्यानेच त्यावर कारशेड उभारले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले. या प्रकल्पाला जपानचे आर्थिक सहाय्य मिळाले आहे. जपान आपले आर्थिक पाठबळ केवळ शाश्वत विकास साधणाऱ्या प्रकल्पांनी देते. विशेष म्हणजे 'मेट्रो-३'ला आर्थिक पाठबळ देण्यापूर्वी जपानने एक वर्ष या प्रकल्पाचा अभ्यास केला. त्यानंतरच त्यांनी या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.



तसेच मुंबई महानगरपालिकेअंतर्गत यापूर्वी पूर्ण करण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी सुद्धा झाडे कापण्यात आली होती. मात्र
, या तोडलेल्या झाडांऐवजी आपण नवीन झाडे लावली. त्याचप्रमाणे कारशेडसाठी कापण्यात येणाऱ्या झाडांऐवजी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने सांगितल्याप्रमाणे १२ ते १३ हजार झाडे लावणार असल्याचे मी या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी सांगू इच्छितो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@