उदयनराजेंच्या हाती 'कमळ' ; अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यातील मोठी ताकद असलेले उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी शुक्रव्वारी मध्यरात्री आपला खासदारकीचा राजीनामा दिला होता. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत अखेर हाती कमळ घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते उपस्थित होते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊनच भाजपची वाटचाल : उदयनराजे भोसले

 

"छत्रपती शिवाजी महारांजांनी देशाला सर्वधर्म समभावाचा विचार दिला आहे. त्या आदर्शावर आपली लोकशाही चालत आहे. त्यांच्या अष्टप्रधान मंडळावर अधारलेली सत्ता आहे. शिवरायांचे विचार घेऊनच भाजप पुढे जात आहे." असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. "प्रत्येक राज्यात विकास होत आहे. त्यामुळेच अनेकजन भारतीय जनता पक्षात येत आहेत. काश्मीरप्रश्नी पहिल्यांदाच भाजपने मोठे पाऊल उचलले आहे. देशाच्या अंखडतेसाठी हे गरजेचे आहे." असेही त्यांनी पुढे सांगितले.

 

"जनता भाजपमध्ये कोणाच्या सांगण्यावरून जोडली जात नाही तर ती त्यांच्या विचारसरणीमुळे पक्षात येत आहे. त्याचप्रमाणे मीही भाजपमध्ये प्रवेश केला. निस्वार्थीपणे मी जनहितासाठी ३ महिन्यात खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासोबत मिळून काम करेन." असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@