खुशखबर : निर्यातवाढीसाठी विविध योजना अर्थमंत्र्यांकडून जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : स्थावर मालमत्ता उद्योग आणि निर्यात वाढ यांना चालना देणाऱ्या निर्णयांची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये केली. गृहप्रकल्पांसाठी स्पेशल विंडोमधून मदत करण्यात येणार असून त्यासाठी सरकार १० हजार कोटी देणार असल्याची घोषणा सितारामन यांनी केली. यावेळी त्यांनी निर्यावाढीसाठी उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजनांच्या घोषणा केल्या. परवडणारी घरे, मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी १० हजार कोटीच्या विशेष निधीची घोषणा करतानाच घरासाठी तात्काळ कर्ज मिळावीत म्हणून स्पेशल विंडो तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

 

या आहेत काही महत्वाच्या घोषणा

 

- भारतामध्ये दुबईसारखा वार्षिक मेगा शॉपिंग फेस्टिव्हल मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये वस्त्रोद्योग, हस्तकला, योगा अशी विविध संकल्पना असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

- प्राप्तिकरदात्यांकडून कर भरताना किरकोळ चुक झाल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येणार नाही, असा दिलासा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला.

- ४५ लाख रुपयांपर्यंत घर खरेदी केल्यानंतर टॅक्सवर सूट देण्याचा निर्णयाचा फायदा रिअल इस्टेट सेक्टरला मिळाला आहे.

- छोट्या डिफॉल्टमध्ये आता फौजदारी खटला चालणार नाही. २५ लाखांपर्यंत टॅक्स डिफॉल्टर्सवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजूरी घेणे आवश्यक आहे.

- देशातील सर्व बंदरावर मॅन्युअल क्लियरेंस डिसेंबर २०१९ संपेल.

- इन्कम टॅक्समध्ये ई-असेसमेंट स्कीम लागू केली जाईल. ही ई-अमेसमेंट स्कीम दसरा झाल्यानंतर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही.

- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विमानतळ तसेच बंदरावरील निर्यातीवर लागणाऱ्या वेळेत कमी करण्यात येणार

- जीएसटी आणि आयटीसी रिफंडसाठी लवकरच इलेक्ट्रॉनिक सिस्टिम सुरू होणा

- १९ सप्टेंबरला सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार

- महागाई नियंत्रणात असून महागाईचा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी करण्यास यश

@@AUTHORINFO_V1@@