जगातील सर्वात श्रीमंत तेल कंपनीवर ड्रोन हल्ले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांच्या यादीत येणाऱ्या सौदी अरेबियाच्या तेल कंपनी 'अरामको'च्या दोन फॅसिलिटी सेंटर्समध्ये आग लागली. ही आग ड्रोन हल्ल्यामुळे लागल्याची माहिती खुद्द सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली. "पहाटे चार वाजता औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर दिले. 'अबकेक' आणि 'खुराइस' येथील फॅसिलीटी सेंटर्सवर ड्रोन हल्ला झाला होता." अशी माहिती त्यांच्या मंत्रालयाने दिली आहे.

 

पुढे मंत्रालयाने सांगितले आहे की, 'देशातील पूर्वेकडील भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यांची चौकशी सुरू आहे. हे कोणाचे कारस्थान आहे, त्याचा शोध चालू आहे.' दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. मागील महिन्यातदेखील अरामकोच्या नॅचरल गॅसच्या फॅसिलिटी सेंटरवर हल्ला झाला होता. यमनच्या हूथी विद्रोही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

@@AUTHORINFO_V1@@