महात्मा गांधी जयंतीपासून रेल्वेत बायोटॉलेट्सचा वापर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : येत्या २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून देशातील लांबपल्ल्याच्या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये बायोटॉयलेटस् पाहायला मिळणार आहे. रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, 'हे काम वेगाने सुरू असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल त्यावर देखरेख ठेवून आहेत.' याव्यतिरिक्त, सफाई कर्मचाऱ्यांसाठी एक नवे अ‍ॅप विकसित करण्यात आले असून, तेही गांधी जयंतीपासून सुरू होणार आहे.

 

याबाबद्दल त्यांनी सांगितले की, "रेल्वेच्या सफाईची जबाबदारी असलेल्या कर्मचा-यांना या अ‍ॅपच्या आधारे हजेरी लावावी लागणार आहे. तसेच, रेल्वेच्या कोचमध्ये सफाई केल्यानंतर त्याचे छायाचित्र त्या अ‍ॅपवर टाकणेही त्याच्यावर बंधनकारक असेल. या अ‍ॅपमुळे रेल्वेगाड्यांमधील स्वच्छता दिसू शकेल. रेल्वेचे सर्व कारखाने व कोच फॅक्टरी अपारंपरिक ऊर्जेवर चालावेत, असेही आमचे प्रयत्न आहेत." रेल्वेच्या सा-या इमारतीही अशाच विजेवर चालवण्यासाठी तयारी सुरू आहे. दिल्लीतील रेल भवनातही अपारंपरिक विजेचा वापर व्हावा, यासाठी रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी यांना सूचना दिल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@