प्लास्टीक बंद ! ४०० रेल्वे स्थानकात मिळणार कुल्लड चहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



 


नवी दिल्ली : लवकरच देशभरातील एकूण चारशे रेल्वेस्थानकांवर मातीच्या भांड्यांमध्ये खाद्यपदार्थ उपलब्ध होणार आहेत. प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कामासाठी दररोज दोन कोटींहून जास्त मातीची भांडी तयार केली जाणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने हे निर्देश जारी करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहून पाचशे रेल्वेस्थानकांवर प्लास्टिकबंदीची घोषणा करावी, अशी विनंती केली होती.

 

चारशे रेल्वेस्थानकांत प्लास्टिक कप आणि इतर वस्तूंऐवजी मातीची भांडी वापरली जाणार आहेत. यात दिल्लीतील सहा, राजस्थानातील १८, पंजाबमधील २५, उत्तर प्रदेशातील ४०, बंगालमध्ये २३, बिहारच्या २५, महाराष्ट्रातील १९, गुजरातमध्ये २३, केरळमध्ये सहा, आंध्र-प्रदेशमध्ये आठ, जम्मू-काश्मीर आणि लेहमधील चार रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.

 

खादी ग्रामोद्योगाला प्रेरणा

गतवर्षात खादी ग्रामोद्योगने वाराणसी आणि रायबरेली स्थानकात कुल्लड प्रकल्प सुरू केला होता. केव्हीआयसीने असे प्रकल्प दोनशे स्थानकांवर सुरू करून याला प्रोत्साहन देण्याची मागणी केली होती. रेल्वे प्रबंध अधिकाऱ्यांनी यावर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

 

दररोज बनतात ७५ लाख कुल्लड

खादी ग्रामोद्योगतर्फे किसान सशक्तीकरणासाठी जून २०१८ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. केंद्र सरकारने नव्याने निर्देश दिल्यानंतर आता या योजनेला पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मार्च २०१९ पर्यंत या योजनेअंतर्गत कुंभार आणि कुल्लड निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये १० हजार, ६२० इलेक्ट्राॅनिक यंत्रे वाटण्यात आली होती. या अंतर्गत आत्तापर्यंत दररोज ७४ लाख, ३४ हजार इतकी मातीची भांडी बनवली जातात. हा आकडा अडीच कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

 

एकूण ३० हजार इलेक्ट्राॅनिक यंत्रांचे वाटप होणार

केवीआयसीचे अध्यक्ष वी. के. सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, "केंद्र सरकारने कुल्लड आणि इतर मातीची भांडी तयार करण्यासाठी एकूण ३० हजार नवी यंत्रे वाटण्याची योजना आखली आहे. वाराणसी येथे एक ग्रँँडिंग मशीनही उभारले जाणार असून त्यात खराब झालेली भांडी नष्ट केली जाणार आहेत."

 
@@AUTHORINFO_V1@@