राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



मुंबई
:राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव संपल्यामुळे आता कधीही राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. अशातच या निवडणुका पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका आज मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील ४० टक्के लोक पुरबाधित आहे, बऱ्याच लोकांनी दुष्काळामुळे स्थलांतर केले आहे, त्यामुळे त्यांना या निवडणुकीत सहभागी होण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच यावर निर्णय व्हावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.


महाराष्ट्रासह हरयाणा आणि झारखंडमध्ये हे वर्ष संपण्याआधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून बैठकाही घेतल्या जात आहेत. दिवाळीपूर्वी महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये मतदान आणि मतमोजणीची प्रक्रियाही पूर्ण होऊ शकते
, असे काही माध्यमांनी म्हटले आहे. सन २०१४मध्ये या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा २० सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर १५ ऑक्टोबरला मतदान पार पडले होते.

@@AUTHORINFO_V1@@