२२ तासानंतर लालबागच्या राजाला निरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जन सोहळा अगदी उत्साहात पार पडला. १० दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यांनतर गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. उत्साहपूर्ण वातावरणात तसेच ढोल ठशांच्या गजराने मुंबईसह पुण्यामध्येही उत्साही वातावरण पाहायला मिळाले.

 

शुक्रवारी सकाळी ८.३०च्या सुमारास 'लालबागच्या राजा'चे गिरगावच्या समुद्रात शाही विसर्जन करण्यात आले. तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राज्याला निरोप देण्यात आला. हा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गणेशभक्तांनी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी केली होती.

 

लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानीही उपस्थित होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी असलेल्या तराफ्यावर अनंत अंबानी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह हजर होते. बाप्पाचे विसर्जन होईपर्यंत ते तराफ्यावरच असल्याचे पाहायला मिळाले. तीन दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह लालबागच्या राजाच्या आरतीला हजेरी लावली होती.

@@AUTHORINFO_V1@@