दिल्ली विद्यापीठात 'अभाविप'चा झेंडा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |


 

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांमध्ये तीन जागांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बाजी मारली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणूक मतमोजणीला शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. या चारही जागांवर अभाविप आघाडीवर होते पण दुपारी ३.३० च्या सुमारास अंतिम निकाल हाती आले. त्यानुसार, 'अभाविप' तीन जागांवर तर 'एनएसयूआय'ने एका जागेवर बाजी मारली. गुरुवारी झालेल्या मतदानप्रक्रियेत ३९.९ टक्के मतदान झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मतदान ४ टक्क्यांनी कमी झाले.

 

 


अध्यक्षपदी अक्षित दहिया
, उपाध्यक्ष पदी प्रदीप तंवर तर संयुक्त सचिव पदावर शिवानी खरवाल यांनी बाजी मारली. विद्यार्थी संघटना एनएसयुआय, अभाविप आणि आयसा यांमध्ये ही लढत झाली. या निवडणुकीत चार महिलांसह एकूण १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी एकूण ५२ महाविद्यालये आणि विभागांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. दिल्ली विद्यापीठाच्या एकूण मतदानाच्या आकडेवरीनुसार, यंदाच्या मतदानात घट झाली आहे. ईव्हीएमच्या साहाय्याने हि मतदान प्रक्रिया पार पडली.
@@AUTHORINFO_V1@@