होय ! आम्हीच दहशतवाद्यांना पोसले : पाकिस्तानची कबुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |


"दहशतवादामुळे आत्तापर्यंत ७० हजार पाकिस्तानी ठार मारले गेले" 


इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी अखेर पाकिस्तानच्या भूमीत दहशतवाद पोसल्याची कबुली दिली आहे. यापूर्वी हे कृत्य अमेरिका करत असल्याचा दावा वेळोवेळी इमरान खान यांनी केला होता. मात्र, अखेर दहशतवादापोटी पाकिस्तानने कोट्यवधींची उधळपट्टी केल्याची कबुली खुद्द इमरान खान यांनी दिली आहे. ८० च्या दशकात जेव्हा सोव्हिएतने अफगाणिस्तानवर कब्जा केला, त्यावेळी मुजाहिद्दीनने जिहादींना तयार केल्याचे आणि त्यासाठीचा पैसा अमेरिकेच्या सीआयएने पुरवल्याचे इमरान म्हणाले.

आता त्यांनी दहशतवादाचे खापर इमरान खान यांच्यावर फोडले आहे. जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये दखल द्यायला सुरुवात केली, त्यावेळी जिहादचे रुपांतरण दहशतवादात झाले. पाकिस्तानने आता दहशतवाद्यांच्या जाळ्यात न अडकता तटस्थ राहायला हवे. दहशतवाद पोसल्यामुळे आपलेच नुकसान होत आहे. दहशतवादामुळे आत्तापर्यंत ७० हजार पाकिस्तानी ठार मारले गेले. आपल्या शंभर अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. अमेरिकेने दहशतवादी म्हणत पाकिस्तानला नापाक ठरवले. ही सर्वात वाईट गोष्ट आहे.

पाकिस्तान तोंडावर आपटला !

अमेरिकेशी मैत्री करू इच्छिणाऱ्या इमरान खान यांचे सर्व मनसुबे फोल ठरले आहेत. भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर अनेक ठिकाणचे दरवाजे ठोठावल्यानंतर पाकिस्तानची निराशा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर अमेरिका या प्रकरणी लक्ष घालेल, अशी आशा इमरान यांना होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्समध्ये भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदींवर काश्मीरप्रश्नी विश्वास दाखवला होता. कलम ३७० आणि काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे मत ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केले होते.

आता इस्लामच्या नावे ध्रुवीकरण

एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर प्रसारित केलेल्या भाषणात इमरान खान यांनी आता इस्लाम देशांनी एकत्र येण्याची साद घातली आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रानेही त्यांना मदत करण्यास तयारी न दर्शवल्याने आता इस्लामिक राष्ट्रांना एकत्र येण्यासाठीचा नारा यापूर्वीही लगावला आहे. पाकिस्तानने युएई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वोच्च सन्मानानंतर आपल्या सिनेटची युएई यात्रा रद्द केली होती.


@@AUTHORINFO_V1@@