दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेत 'या' खेळाडूची वर्णी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



मुंबई : भारतीय संघाने नुकतेच वेस्ट इंडिजला नमवत कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सध्या अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर आता २ ऑक्टोबरपासून भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून त्यासाठी संघदेखील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये रोहित शर्माचा समावेश करण्यात आला असून भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल यालाही संधी देण्यात आली आहे. तसेच, के.एल. राहुलला मात्र संघातून वगळण्यात आले आहे. सध्या भारत कसोटी चॅम्पियनशिपमध्ये १२० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना वेस्ट इंडीज दौर्‍यामध्ये विजयी झालेल्या भारतीय संघात काही बदल केले गेले आहेत. सलामी आणि मध्यफळीसाठी शुभमन गिलचा पर्यायी फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच, रोहित आणि मयांक अग्रवाल ही जोडी आता भारतीय संघाच्या डावाला सुरुवात करणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ टी -२० मालिका खेळवण्यात येणार आहे.

 

असा असेल भारतीय संघ

 

विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृध्दिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुभमन गिल

@@AUTHORINFO_V1@@