'शेअर ट्रेडिंग' म्हणजे स्वतः विरूद्ध असलेल एक युद्ध !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



हो!... तुम्ही बरोबर वाचलं शेअर ट्रेडिंग म्हणजे स्वतःविरुद्धच जे एक युद्ध जे मन आणि मेंदू या दोघांमध्ये सुरू असते. 'शेअर ट्रेडिंग'मध्ये तुम्ही कितीही आणि कोणतीही स्ट्रॅटेजी वापरा किंवा कोणत्याही इंडिकेटर वापर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुमचे नुकसान होणार हे निश्चित.

'ट्रेड' घेतल्यानंतर तो ट्रेड क्लोज होईपर्यंत जे आपल्या मनात चालू असते त्यामुळेच बहुतांश ट्रेडर स्वतःचे नुकसान ओढावून घेत असतात. आपण घेतलेला ट्रेड बरोबर आहे का ?, शेअर नक्की वरती जाईल ना ? जो नफा मिळत आहे तो घेऊ कि आणखी थांबू, असे आणि अनेक गुंतवणूक करताना मनात सुरू असतात. त्यामुळे असे प्रश्न आपल्याला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत. परिणामी आपण गुंतवणूकीतील नुकसात वाढत जाते.

काहीजण इतक्या तणावाखाली येऊन काम करत असतात, कि जर बाजार गडगडला तर त्याबरोबर आपणही बुडू, अनेकांना पैसा जाण्याच्या भीतीने झोप लागत नाही. शेअर बाजारात पैसा बुडाल्यास सर्व संपेल, अशी भीती असणाऱ्यांनी मुळात येथे पैसा गुंतवूच नये, असे गुंतवणूक सल्लागारांचे मत आहे. अशा मानसिकतेमुळे गुंतवणूक तर दूरच पण विकतचे आजार मागे लावून घेण्यात काही अर्थ नाही, असे गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे शेअर बाजारात जर नफा कमवायचा असेल तर आपल्या स्वतःबरोबरचे युद्ध पहिले जिंका त्यानंतर सर्व गोष्टी तांत्रिक आणि इतर मुलभूत गोष्टी शिकूनच बाजारात उतरा. बाजारात आपल्याला जमेल इतकीच जोखिम घ्या...!

- नितीलेश पावसकर

तनिषा अकॅडमी, रत्नगिरी (8605168525)

@@AUTHORINFO_V1@@