ठरलं ! उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाची अधिकृत घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |




सातारा : पश्चिम महाराष्ट्रामधील साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले यांचा अखेर भाजप प्रवेश निश्चित केला आहे. शनिवार १४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली. नवी दिल्लीमध्ये उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा होणार आहे.

 
 
 

ट्विटरवर उदयनराजे भोसले यांनी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी एक पोस्टर शेअर केले आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, "आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील". तत्पूर्वी, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती.

@@AUTHORINFO_V1@@