महिंद्रा अॅण्ड महिंद्राची खास ऑफर : १९ हजारांमध्ये मिळवा 'एसयुव्ही'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली : महिंद्रा अॅण्ड महिंद्रातर्फे ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. कंपनीने रेव्ह कार्ससह एका सदस्यत्वाचा पर्याय ग्राहकांसाठी खुला केला आहे. १९ हजार ७२० ते ८७ हजारापर्यंत मासिक शुल्काच्या आधारे ग्राहकांना खरेदीविना वाहनाचा ताबा दिला जाणार आहे. या शुल्कात गाडीचा देखभाल खर्च आणि वाहन विमा अंतर्भूत असणार आहेत. याशिवाय प्रत्येक मॉडेलनुसार ग्राहकांना वेगळी रक्कम डिपॉझिट म्हणून भरावी लागणार आहे.


ग्राहकांना हे सदस्यत्व पुढील वर्षभरात नव्याने घेता येणार आहे. त्यावेळी एक नवी कोरी गाडीही कंपनीकडून सध्याच्या वाहनाच्या बदल्यात मिळेल. महिंद्राच्या विविध मॉडेल्सनुसार ग्राहकांना १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागेल. वाहन परत करताना ही रक्कम ग्राहकांना मिळेल. यासह कंपनी प्रत्येक ग्राहकाला मेंटेनन्स, २४ तास रोड असिस्टंट, अपघातातील नुकसानीची दुरुस्ती आणि विमा आदी सुविधा पुरवणार आहे.

कोणत्या कारसाठी किती रक्कम ?

Alturas - ८७,००० रुपये

Marazzo - ३४,००० रुपये

XUV300 - २६,००० रुपये

KUV100 - १९, ७२० रुपये

कंपनीचे मुख्य विपणन अधिकारी रामा नार्का यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्र ग्राहकांना आपल्या ब्रॅण्डचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी कंपनी बऱ्याच व्यावसायिक मॉडेलचा अवलंब करणार आहे. त्यात ग्राहकांना भाडेतत्वावर वाहन विकत घेण्याचीही मुभा देण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@