लोढा समूहातर्फ पाच महिन्यांत तीन हजार कोटींच्या सदनिकांची विक्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रात १५ टक्क्यांची हिस्सेदारी वाढली

 
 

मुंबई : भारतातील सर्वांत मोठा रहिवासी रिअल इस्टेट विकासक समूह असलेल्या लोढा ग्रुपतर्फे पहिल्या पाच महिन्यांमध्ये तीन हजार कोटी इतक्या किमतीच्या घरांची विक्रीची घोषणा केली. ऑटोची क्षेत्रात विक्री तीस टक्क्यांपेक्षा अधिक मंदावली आहे आणि गृह क्षेत्रामध्येही तणाव आहे, अशा स्थितीत लोढा समूहाने उत्तम कामगिरी केली आहे येत्या काळात सणासुदीच्या दिवसांच्या आधी बाजारपेठेमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

लोढ़ाचे मुख्य विक्री अधिकारी प्रशांत बिंदल म्हणाले, “विविध विक्री दरांतील आमच्या प्रदर्शनामुळे आम्ही समाधानी आहोत. आमच्या रहिवासी विक्रीमधील आता ५०% इतका वाटा असलेल्या वाजवी दरातील गृह प्रकल्पांमध्ये आमची अतिशय चांगली विक्री झाली आहे. तसेच, मध्य मुंबईतील आमचे तयार प्रकल्प- लोढ़ा पार्क आणि वर्ल्ड टॉवर्स- रेडी टू मूव्ह इन असून त्यांचे प्रदर्शन अतिशय उत्तम आहे व पहिल्या पाच महिन्यांमधील आमच्या विक्रीमध्ये त्यांचा वाटा रू. सहाशे कोटी इतका आहे.

त्यांनी सांगितले, “मध्य मुंबईमधील आमचा मार्केटमधील वाटा आता गेल्या वर्षीच्या २० % पासून ३५% इतका वाढला आहे व त्याचे कारण आम्ही डिलीव्हर केलेली उच्च गुणवत्तेची उत्पादने, हे आहे. सणासुदीच्या दिवसांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत आणि डिसेंबरपर्यंत पुढील चार महिन्यांमध्ये अतिरिक्त रूपये तीन हजार कोटींची विक्री डिलिव्हर करण्याची आमची अपेक्षा आहे व त्याद्वारे आम्ही भारतातील क्रमांक एकचे रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून आमची स्थिती आणखी बळकट करू.

दक्षिण मुंबईतील आघाडीच्या ब्रोकर्सपैकी एक असलेल्या जयेश शाह ह्यांनी म्हंटले, “सर्वसाधारण मार्केटमध्ये मंदी असली तरी डिलिव्हरीचे उत्तम रेकॉर्ड असलेल्या मोठ्या प्लेअर्सची विक्री सुरू आहे. लोढ़ांच्या संदर्भात डिलिव्हरीबद्दल कोणत्याच अडचणी नसतात आणि म्हणून त्यांची विक्री उत्तम चालू आहे, असे दिसते. तसेच, मध्य मुंबईतील त्यांचे दोन मोठे प्रकल्प- पार्क आणि वर्ल्ड टॉवर्स ह्यांना ओसी मिळालेली आहे आणि जीएसटी बचती आणि सज्ज असल्यामुळे ह्या प्रकल्पांची विक्री चांगली होताना दिसते.

नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर आघाडीच्या आणखी एक ब्रोकरनी म्हंटले, “लोढाचे प्रदर्शन अतिशय दिलासादायक आहे, कारण हे क्षेत्र पूर्णपणे कोलमडणार नाही, ह्याची खात्री ते घेत आहेत. आपल्यासाठी ते इमारती बांधत आहेत, विक्री करत आहेत, डिलिव्हरी करत आहेत, बिजनेस निर्माण करत आहेत आणि लोकांना रोजगार देत आहेत. त्यांच्या डेब्टबद्दल मुद्दे असले तरी, त्यांच्या डेब्टचा परिणाम त्यांच्या बिजनेस प्रदर्शनावर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पलावामध्ये घर घेऊ इच्छिणारे आगामी ग्राहक सिताराम मराठे ह्यांनी म्हंटले, “मी गेल्या तीन महिन्यांपासून विविध प्रकल्पांना भेट देत आहे, कारण माझी मुले मोठी होत आहेत आणि एक बेडरूमकडून दोन बेडरूमच्या घरात आम्हांला शिफ्ट व्हायचे आहे. पलावाला ही माझी तिसरी भेट आहे आणि माझी पत्नी व मुलांना इथली डेव्हलपमेंट आवडल्यामुळे व इथे शाळा व मॉलसारख्या अनेक सुविधा असल्यामुळे मी आज इथे खरेदी करत आहे. इतर प्रकल्प जरी वचन देत असले की, ते डिलिव्हर करतील, मला इथे सर्व रेडी दिसते. मला ट्रॅफिकची काळजी वाटते आहे, परंतु नवीन मेट्रो लाईनमुळे मला कामाच्या ठिकाणी लवकर जाता येईल. सध्या लोढांचे मुंबई महानगर प्रदेशामध्ये व पुण्यामध्ये तीसपेक्षा जास्त प्रकल्प आहेत व त्यामध्ये वरळीतील लोढा पार्क, लोअर परेलमधील लोढा वर्ल्ड टॉवर्स, ठाण्यातील लोढा अमारा आणि नवी मुंबईतील पलावा ह्यांचा समावेश आहे

@@AUTHORINFO_V1@@