आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली
: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भारतीय सांस्कृतिक संबंध (आयसीसीआर) आयोजित आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. नवी दिल्लीशिवाय लखनौ, अयोध्या आणि पुण्यातही या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 





थायलंड
, त्रिनिदाद आणि टोबॅगो, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका, मॉरिशस, बांगलादेश आणि फिजी यासह जगभरातील आठ देश या महोत्सवात सहभाग घेतील. आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव आयसीसीआरद्वारे गेल्या 15 वर्षांपासून दरवर्षी आयोजित केला जातो. रामायणाची महती भारताबरोबरच इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम या देशांमध्येही आहे. तेथेही रामायण महोत्सव होतात. हा महोत्सव आंतरराष्ट्रीय असेल. देशो-देशींच्या पद्धतीनुसार तेथील भाषांमध्ये रामायण सादर केले जाईल. लेझर शो आणि दृक्श्राव्ये देखावेही महोत्सवात असतील. अन्य माध्यमांतूनही रामायण सादरीकरण करण्यात येईल.
@@AUTHORINFO_V1@@