बीसीसीआयमध्ये जेटलींचे अमूल्य योगदान : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारताचे सर्वात जुने स्टेडीयम म्हणून ओळखले जाणारे फिरोज शाह कोटला स्टेडीयमचे नाव आता माजी मंत्री अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. दिल्ली क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. तसेच जेटली स्टेडीयमच्या एका पॅवेलीयनला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

 

"अरुण जेटली यांनी क्रीडा क्षेत्रासाठी मोठे योगदान दिले आहे. क्रीडा संघांना निधी मिळवून देण्यासाठी ते कायदेशीर लढाई लढत होते. बीसीसीआयसाठीही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच बीसीसीआयची इथपर्यंत वाटचाल झाली आहे. बीसीसीआयला प्रभावी करण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी संघर्ष केला तर आयपीएल आल्यानंतरही कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०चा फॉर्मेट कायम ठेवण्यासाठी जेटलीनं कार्य केले. ते बीसीसीआयला नेहमीच कायदेशीर सल्ला द्यायचे. आयपीएल यशस्वी करण्यासाठीही त्यांनी योगदान दिले होते." असे अमित शहा यांनी कार्यक्रमात सांगितले.

 

डीडीसीएने आयोजित केलेल्या या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, क्रीडामंत्री किरण रिजीजू, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राजवर्धन राठोड तसेच बीसीसीआयचे मान्यवर यावेळी उपस्थित होते. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सामन्यासाठी निवडला गेलेला भारताचा संघही या कार्यक्रमात उपस्थित होता. तसेच भारताचे माजी कर्णधार कपील देव, अजय जडेजा, अतुल वासन हेही यावेळी हजर होते. अरुण जेटली यांचे कुटुंबसुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

@@AUTHORINFO_V1@@