पी.के.मिश्रा यांची पंतप्रधानांच्या प्रमुख सचिवपदी नियुक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2019
Total Views |




नवी दिल्ली
: पंतप्रधानांचे प्रमुख सचिव म्हणून माजी कॅबिनेट सचिव पी के मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कुमार मिश्रा यांना बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले गेले, तर पी. के. सिन्हा यांना त्यांचे नवीन प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले. मिश्रा सध्या पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव आहेत आणि सिन्हा पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारीचा कार्यभार सांभाळत आहेत.


मिश्रा यांनी केबिनेट दर्जा मिळणार आहे. १९७२च्या बॅचचे आयएएस असलेले डॉ. पीके मिश्रा हे २००६ ते २००८ या कालावधीत भारताचे कृषी सचिव होते. पीके मिश्रा यांनी केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये बरीच महत्त्वाची पदे भूषवली आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल)
, प्रधान सचिव (कृषी व सहकार), प्रधान सचिव गुजरात मुख्यमंत्री, गुजरात इलेक्ट्रिक बोर्डाचे सदस्य, डीएम आणि महेसाणा व बनासकांठा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, केंद्रीय कृषी सचिव, विशेष सचिव गृह मंत्रालय, अतिरिक्त सचिव नगरविकास मंत्रालय इत्यादी पदे त्यांनी भूषवली आहेत.


भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्तीनंतर पी
के मिश्रा यांना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरात विद्युत नियामक मंडळाचे अध्यक्ष केले. ११ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपला. यानंतर पीके मिश्रा यांची २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिरिक्त प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. या दरम्यान नृपेंद्र मिश्रा हे पीएमओचे प्रधान सचिव होते. आता ही जबाबदारी अर्थशास्त्र विषयातून पीएचडी प्राप्त केलेले डॉ.पी.के.मिश्रा यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

@@AUTHORINFO_V1@@