आसाम नाहीतर देशभरातील घुसखोरांना बाहेर काढणार : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2019
Total Views |




गुवाहाटी
: आसाममधील एनआरसी यादी नुकतीच सरकारने जाहीर केली. त्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले. "केंद्र सरकार आसाममधीलच नाही तर संपूर्ण देशभरातील घुसखोरांना बाहेर काढणार आहे. संपूर्ण देशाला आम्हाला घुसखोर मुक्त करायचे आहे
, असे अमित शाह यांनी सांगितले. एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाल्यांनतर पहिल्यांदाच अमित शाह आसामचा दौरा केला. गुवाहाटी येथे एनइडीए मीटिंग दरम्यान ते बोलत होते.




आसाम मधील लोकांना स्वतःची ओळख मिळावी व बांगलादेशातून घुसखोरी केलेल्या लोकांमध्ये त्यांची गणना केली जाऊ नये याकरिता सरकार प्रयत्नशील आहे. यासाठीच एनआरसी यादी बनविण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे काही लोकांना असे वाटते कि त्यांची नावे त्या यादीत चुकून आली नाहीत. त्यामुळे ते चिंतीत आहेत. एनआरसीमधून नावे वगळलेले आपल्या राज्यात परत जाऊ शकतात. त्यामुळे आसाममध्ये एकही घुसखोर राहणार नाही तसेच ते इतर राज्यातही घुसखोरी करणार नाहीत याकरिता आमचे सरकार प्रयत्नशील आहे, असे शाह यावेळी म्हणाले.एनआरसीची अंतिम यादी ३१ ऑगस्टला जाहीर करण्यात आली. या यादीत ३ कोटी ११ लाख २१ हजार ४ लोकांचा समावेश होता तर तब्बल १९ लाख ६ हजार ६५७ लोकांना या यादीतून वगळण्यात आले आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@