काँग्रेसची गळती चालूच : उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2019
Total Views |


 


मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

'आपण काँग्रेसच्या विचारधारेला मानतो आणि फक्त निवडणुकीपुरता पक्षात आलेलो नाही,' असंही तिने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेताना पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. परंतु, सहा महिन्याच्या आतच पक्षातील गटबाजीला कंटाळून तिने काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. "माझी राजकीय आणि सामाजिक संवेदनशीलता मला पक्षामध्ये स्वार्थी हेतू आणि हितसंबंधांसाठी वापरून घेण्यापासून रोखत आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मोठ्या ध्येयासाठी काम करण्याऐवजी क्षुद्र अंतर्गत राजकारण आणि संघर्ष सुरू आहेत. यामध्ये माझा वापर करून घेतला जात आहे. याच कारणाने मी राजीनामा देत आहे," असे उर्मिला यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@