पेटीएमचे मालक खरेदी करणार येस बॅंकेचा हिस्सा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2019
Total Views |



मुंबई : ई-वॉलेट सेवा देणारी कंपनी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी येस बॅंकेचे समभाग खरेदी करण्याची उत्सूकता दर्शवली आहे. येस बॅंकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांनी आपल्या परिवाराच्या नावे असलेली ९.६४ टक्के हिस्सेदारी दोन हजार कोटींना विकण्याचा निर्णय घेतला आहे. राणा कपूर यांनी आपले बंधू अशोक कपूर यांच्यासह मिळून येस बॅंकेची स्थापना केली होती.

दरम्यान २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्यात अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राणा कपूर आणि अशोक कपूर यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. या दोघांचा मिळून येस बॅंकेत २० टक्के हिस्सा आहे. दीर्घकाळ व्यवस्थापकीय मंडळावर राहिल्यावर ३१ जानेवारी २०१९ रोजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार झाले.

 

पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांनी १८०० ते दोन हजार कोटींना येस बॅंकेची ९.६४ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र, त्यापैकी एकूण ६० टक्के शेअर हे रिलाय़न्स निप्पोनकडे तारण म्हणून ठेवले आहेत. दरम्यान, यानंतर येस बॅंकेचा शेअर मंगळवारी जोरदार उसळला. तो पाच टक्क्यांनी वधारून ६३ रुपयांवर कामगिरी करत होता.

@@AUTHORINFO_V1@@