काँग्रेस नेत्यांचे विद्यार्थ्यांना गुंडागर्दीचे धडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2019
Total Views |



रायपूर
: नेता होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची कॉलर धरा असे वक्तव्य छत्तीसगढचे उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे नेते कवासी लखमा यांनी केले. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी एका शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी असे वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना भाषणादरम्यान त्यांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले की
,"एका मुलाने मला विचारले होते की आपण इतके मोठे नेते कसे झाले आहात, मलाही मोठा होऊन नेता व्हायचं आहे. यासाठी मला काय करावे लागेल. त्याला उत्तर देताना कवासी म्हणाले की जिल्हाधिकारी आणि एसपीची कॉलर पकडली पाहिजे. मग तुम्ही मोठे नेता व्हाल. हे उत्तर ऐकून सगळे हसले."


भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवरतन शर्मा म्हणाले की
, मंत्री कावासा लखमा यांचे हे विधान कॉंग्रेसची संस्कृती दर्शवते. ते मुलांना मोठे झाल्यावर दादागिरी करण्याची शिकवन देत आहेत. कवासी लखमा हे वारंवार आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात.

@@AUTHORINFO_V1@@