'झू'च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंची दांडी गुल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2019
Total Views |


 
 

मुंबई (प्रतिनिधी) - आरे वसाहतीत नियोजित असणाऱ्या 'मेट्रो-३' च्या कारशेडबाबत शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला. मात्र, याचवेळी त्यांनी आरेमध्ये महानगरपालिकेअंतर्गत नियोजित असलेल्या प्राणिसंग्रहालयाच्या प्रश्नाबाबत सारवासारव केली. आरेमध्ये प्रस्तावित असणारी कारशेड आणि प्राणिसंग्रहालय हे दोन वेगवेगळे मुद्दे असून सध्या कारशेडला प्राधान्य देत असल्याचे म्हणत त्यांनी प्रश्नाला बगल दिली. एकूणच मेट्रो कारशेडला विरोध दर्शवत असतानाच आदित्य हे कारशेडपेक्षा अधिक विस्तार असणाऱ्या प्राणिसंग्रहालयाला कसा पाठिंबा देऊ शकतात, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून आरेमधील नियोजित कारशेडला प्रचंड विरोध होत आहे. आदित्य ठाकरे यांनीही ट्विट  करून यासंदर्भात आपला विरोध दर्शविला होता. त्यामुळे वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीतही कारशेडच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात शिवसेना नगरसेवकांनी मते दिली होती. आज आदित्य यांनी याविषयासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले. या पत्रकार परिषदेत आरेमध्ये नांदणाऱ्या वन्यजीवांच्या मुद्याला अधोरेखित करण्यात आले. मात्र, यावेळी पत्रकारांनी आरेमध्ये प्रस्तावित असणाऱ्या प्राणिसंग्रहालयाबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे यांनी सारवासारव केली. मुंबई महानगर पालिकेअंतर्गत आरेमधील १२० एकरावर प्राणिसंग्रहालय नियोजित करण्यात आले आहे. हा संपूर्ण प्रकल्प ५०० कोटी रुपयांचा आहे. याठिकाणी सिंगापूर येथील प्रसिद्ध 'नाईट' सफारीच्या संकल्पनेवर आधारित 'नाईट झू' सफारी विकसित करण्यात येणार आहे.

 

याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आरेमध्ये प्रस्तावित असणाऱ्या प्राणिसंग्रहालयात काॅन्झर्वेशन आणि रेस्क्यू सेंटर होणार आहे. कारशेड व प्राणिसंग्रहालयाबाबत आपण वेगळा विचार करायला पाहिजे. आता प्राधान्य कारशेडच्या मुद्याला देणे आवश्यक आहे. प्राणिसंग्रहालयाच्या मुद्यावर आमचे संभाषण सुरू असून तिथे काॅन्झर्वेशन व रेस्क्यू सेंटर प्रस्तावित असल्यामुळे ते हरित जागेत करण्यात येत आहे'. यावर कारशेडला विरोध करणाऱ्या वृक्षप्रेमी झोरू बाथेना यांनीदेखील 'वाईल्डलाईफ अॅक्ट' अंतर्गत वन्यजीव क्षेत्रात प्राणिसंग्रहालयासारख्या गोष्टीला परवानगी असल्याचे म्हटले.

 
@@AUTHORINFO_V1@@