केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा कॉंग्रेसवर हल्ला बोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2019
Total Views |



सिल्व्हासा
: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका भाषणात सिलवासा येथे कॉंग्रेसवर चांगलाच शाब्दिक हल्ला चढविला. अमित शहा म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रीला 'लाज वाटली पाहिजे' की पाकिस्तानने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा संयुक्त राष्ट्रातील काश्मीरसाठी केलेल्या याचिकेत उपयोग केला.


भाजपा अध्यक्ष शहा यांनी एका जाहीर सभेत राहुल गांधींवर कडक शब्दांत निषेध व्यक्त करताना म्हणाले की
, कलम ३७० रद्द करण्याच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाचे लोकांनी समर्थन केले आहे पण तरीही काही लोक त्याचा विरोध करत आहेत. ते म्हणाले, “कलम ३७० मधील बहुतेक तरतुदी काढून टाकण्याच्या निर्णयाला कॉंग्रेसने विरोध केला. राहुल गांधी जे काही विधान करतात त्याची प्रतिध्वनी पाकिस्तानमध्ये ऐकू येते. पाकिस्तानने त्यांच्या अर्जामध्ये राहुल गांधी यांची विधाने समाविष्ट केली आहेत. ही विधाने भारताविरूद्ध वापरली जात आहेत, यासाठी कॉंग्रेस नेत्यांना लाज वाटली पाहिजे."





राहुल गांधींनी काश्मीरमधील कलम
३७० मधील बहुतेक तरतुदी काढून टाकल्यानंतर 'लोक मरणार' व हिंसाचाराच्या घटना वाढणार या विधानाचा उल्लेख केला होता. पाकिस्तानने भारताविरूद्ध केलेल्या याचिकेत याचा उल्लेख केला. कलम ३७० जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देत होते. शाह म्हणाले की, विशेष दर्जा रद्द केल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीर पूर्णपणे भारतामध्ये विलीन झाला आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@