वैश्विक स्तरावरील साहित्य संमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Sep-2019   
Total Views |



कॅप्टन निलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरुवातीची ५ संमेलने ही स्वा. सावरकरांचे साहित्य या विषयावर आयोजित करण्यात आली होती. या विषयावर अनेक वक्त्यांनी जागतिक स्तरावर आपले विचार मांडत स्वा. सावरकर यांचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व खर्‍या अर्थाने जागतिक पटलावर पोहोचवले. त्यानंतर संमेलनाचे वैविध्य जपण्यासाठी मराठीतील विविध विषयांवरील साहित्य या अनुषंगाने या साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सुरुवात करण्यात आली.


साहित्यनिर्मिती करणे, हीदेखील एक मोठी कला आहे. विविध ग्रंथ, कादंबरी, कवितासंग्रह आदींच्या माध्यमातून समोर येणारे साहित्य हे सांस्कृतिक आदानप्रदानाबरोबरच सामाजिक प्रबोधनाचे कार्य करण्यातदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे घुमान येथे करण्यात आलेले आयोजन हे राष्ट्रीय स्तरावर मराठीचा जागर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणारे ठरले. नुकतेच, कंबोडिया येथे शिवसंघ प्रतिष्ठान व विश्व मराठी परिषदेच्या वतीने विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विश्व मराठी साहित्य संमेलनाची संकल्पना २०१० साली शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने सर्वप्रथम मांडण्यात आली. कॅप्टन निलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून सुरुवातीची ५ संमेलने ही स्वा. सावरकरांचे साहित्य या विषयावर आयोजित करण्यात आली होती. या विषयावर अनेक वक्त्यांनी जागतिक स्तरावर आपले विचार मांडत स्वा. सावरकर यांचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व खर्‍या अर्थाने जागतिक पटलावर पोहोचवले. त्यानंतर संमेलनाचे वैविध्य जपण्यासाठी मराठीतील विविध विषयांवरील साहित्य या अनुषंगाने या साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सुरुवात करण्यात आली. त्याच माध्यमातून आजवर भूतान येथे पत्रकारिता, बाली येथे वैद्यकीय, दुबई येथे संरक्षण शास्त्र अशा विषयांवर संमेलन आणि या विषयावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, भाषणे आणि चर्चा आदींचे सत्र पार पडले आहे. विशेष म्हणजे या संमेलनांचे आयोजन आणि नियोजन नाशिकस्थित प्रमोद गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात येत असते.



नुकतेच कंबोडिया येथे आयोजित करण्यात आलेले नववे विश्व मराठी साहित्य संमेलन हे स्थापत्य कलेशी
(पुरातत्त्व) संबंधित साहित्य या विषयावर संपन्न झाले. विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन कंबोडिया येथे करण्यामागे उद्देश असा होता की, कंबोडियामध्ये भारतीयांच्या पूर्वजांची पाळेमुळे रुजली असल्याचा इतिहास आहे. २ हजार वर्षांपूर्वी भारतातील काही व्यापार्‍यांनी सागरी मार्गाचा अवलंब करत येथे स्थायिक होऊन आपला व्यापार वाढविला आणि तेथे भारतीय संस्कृतीची पाळेमुळेदेखील रुजविली, असा इतिहास आहे. कंबोडियात ८००-१००० वर्षांपूर्वी भव्य दिव्य मंदिरांची निर्मिती झाली असून येथील स्थापत्त्य कला जागतिक स्तरावर गौरविली जात आहे. कंबोडियातील अंग्कोर वट या ठिकाणी हजारो एकर जागेत वसलेली विष्णू आणि इतर मंदिरे जगातील सातवे आश्चर्य म्हणून ओळखली जातात. त्यामुळे स्थापत्त्य कलेशी संबंधित संमेलनाला कंबोडिया हाच देश संयुक्तीक असल्याने या संमेलनाचे आयोजन कंबोडियामध्ये करण्यात आले. या संमेलनाला कंबोडिया पर्यटन मंडळाचे संचालक थॉर्न शीनान आणि अंग्कोर वट मंदिर परिसर म्हणजेच सिम रिप सांस्कृतिक विभागाचे प्रमुख व्हॅन बुना हेदेखील उपस्थित होते. या संमेलनाचा हेतू आणि उद्देश त्यांना सांगितला. मधल्या काळात शेकडो वर्षे दोन देशांमधील हरवलेले ऋणानुबंध पुन्हा एकदा जोडण्यास या संमेलनामुळे निश्चितच सुरुवात होईल, असा विश्वास यावेळी कंबोडियाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. यातून दोन देशांच्या सांस्कृतिक आणि पर्यटन देवाणघेवाणीस सुरुवात होण्यास नक्कीच मदत मिळणार असल्याचेदेखील आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.



प्राचीन भारतीय संकृतीची ओळख जगाला व्हावी आणि त्या माध्यमातून निर्माण होणारे दोन देशांचे संबंध हे चिरकाल टिकणारे असावे
, यासाठी अशा सांस्कृतिक आदान-प्रदान करणार्‍या संमेलनाची आज जगास नक्कीच आवश्यकता आहे. जागतिक स्तरावर शांतता आणि सौहार्दता निर्माण व्हावी आणि ती टिकून राहावी, यासाठी साहित्य, कला, संगीत, इतिहास आदी क्षेत्रे मोलाची भूमिका बजावू शकतात. मराठी भाषा ही समृद्ध असून आजच्या आधुनिक काळात तिचा कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, हे उद्घाटनप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेले प्रतिपादन मराठीची महती विशद करण्यासाठी खूपच बोलके आहे. दोन देशांतील राजनीतिक संबंधांची शाश्वती देणे कठीण असते. मात्र, आंतरराष्ट्रीय पटलावर द्विराष्ट्र संबंधांचा आधार संस्कृती आणि त्यातील समान दुवा असला तर, असे संबंध हे शाश्वत ठरणारे असतात आणि त्यामुळे जागतिक पटलावर देशाचा दबदबा वाढण्यास देखील मदत होऊ शकते, हेच या संमेलनातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@