गणेश मंडळांना पालिकेचा दिलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |


 


ऑनलाईन परवानग्यांमधील ‘पासवर्ड’चा घोळ दूर

 

मुंबई : गणेशोत्सव मंडळांना पालिकेकडून मिळणार्‍या ऑनलाईन परवानग्यांमध्ये ‘पासवर्ड’चा निर्माण झालेला घोळ दूर झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवण्यात अडचण येऊ नये, यासाठी पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक विभागाकडून नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. या यंत्रणा प्रशासनाबरोबर समन्वय ठेवणार आहेत. दरम्यान, मुंबईभरातील सुमारे ११ हजार मंडळांपैकी आतापर्यंत दीड हजार मंडळांनी पालिकेकडे अर्ज केले असून १०० मंडळांना परवानग्या देण्यात आल्या आहेत.

 

मुंबईतील सार्वजनिक मंडळांना पालिकेकडून ऑनलाइन परवानगी दिली जाते. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दि. १९ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यामध्ये मंडळांना आपापल्या विभाग कार्यालयात मंडप परवानगीसाठी अर्ज करता येत आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित विभाग कार्यालयाकडून पोलीस, ट्राफिक विभागाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याबाबत ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्यानंतर मंडळांना परवानग्या दिल्या जात आहेत. मात्र, गेले काही दिवस पालिकेकडून पोलीस, ट्राफिक आणि फायर विभागाला परवानग्यांबाबत ‘पासवर्ड’ देण्यात तांत्रिक अडचणी आल्याने परवानग्यांची प्रक्रिया रखडली होती. दरम्यान, आता ही अडचण दूर झाल्याने मंडळांना परवानग्या देण्यात कोणतीही अडचण नसल्याची माहिती उपायुक्त नरेंद्र बरडे यांनी दिली.

 
 
@@AUTHORINFO_V1@@