
वरूण धवन आणि सारा अली खान यांचा एकत्र काम करत असलेला पहिला चित्रपट 'कुली नंबर १' च्या चित्रीकरणाला आज बँकॉकमध्ये सुरुवात झाली. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. या बातमी बरोबरच १ मे २०२० ला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे देखील त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले. त्यामुळे चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असेल. Varun Dhawan and Sara Ali Khan... #CoolieNo1 begins in #Bangkok today... Directed by David Dhawan... Produced by Vashu Bhagnani, Jackky Bhagnani and Deepshikha Deshmukh... 1 May 2020 release. pic.twitter.com/5LYr4xTmp5
वरुण धवनचे वडील, गेले कित्येक वर्ष चित्रपट सृष्टीत त्यांच्या कामामुळे प्रसिद्धी मिळवलेले डेव्हिड धवन हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटापुरते त्या दोघांमधील दिग्दर्शक आणि कलाकाराचे नाते कसे असेल हे पाहण्याची देखील सर्वांना उत्सुकता असेल.
विशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी घेतली असून वरून धवन चा येत्या काळात स्ट्रीट डान्सर हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.