यूएनचा पाकला चिमटा ; मध्यस्तीस नकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भारताने कलम ३७० रद्द करून जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतला. यानंतर मात्र पाकिस्तान मात्र चांगलाच खवळला. पाकिस्तानने भारतविरोधी अनेक पावले उचलली. इतर अन्य देशांकडे मदतीची मागणीदेखील केली. परंतु, सर्वांनी नकार दिल्यानंतर पाक एकाकी पडला. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे हात पसरले असता त्यांनीदेखील पाकिस्तानला चांगले फटकारले आणि मध्यस्थीसाठी नकार दर्शविला आहे.

 

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे मध्यस्थीची मागणी केली परंतु, संयुक्त राष्ट्रानेही पाकिस्तानची ही मागणी नाकारली आहे. यावेळी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान १९७२ मध्ये झालेल्या शिमला कराराची आठवण करून दिली. कलम ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. त्यात पाकिस्तानने आततायीपणे भारताशी राजनैतिक आणि व्यापारी संबंध स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

 

भारताच्या या निर्णयाविरोधात संयुक्त राष्ट्रसंघात मागणी करत काश्मीरप्रश्नी योग्य भूमिका घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. मात्र, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी शिमला कराराची आठवण करून देत काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास थेट नकार दिला. "सरचिटणीस जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याप्रश्नी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले आहे," असे गुटेरेस यांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी माध्यमांना सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@