जनकल्याण समितीतर्फे मदतीसाठी आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |



कोल्हापूर : जनकल्याण समितीतर्फे कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. या मदतकार्यात रा. स्व. संघ, जनकल्याण समिती व शेकडो कार्यकर्ते, संस्था-संघटना पुढाकाराने सहभागी झाल्या आहेत. तरी, आपणही सढळ हस्ते पूरग्रस्तांना धान्य, शुद्ध पाणी, औषधे तसेच रोख रक्कम धनादेशाद्वारे निधी म्हणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

मदत देऊ इच्छिणाऱ्यांनी पंचगंगा सहकारी बँकेच्या सर्व शाखा - महाद्वार रोड, देवकर पाणंद, प्रतिभा नगर व कावळा नाका शाखेत जमा करावी, मदत चेकने किंवा रोख दिल्यास या केंद्रावर पावती दिली जाईल. तसेच, या देणगीस करसवलतही आहे. ऑनलाईन पैसे पाठवायचे झाल्यास आरएसएस जनकल्याण समिती, कोल्हापूरच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा : न्यू महाद्वार रोड, खारी कॉर्नर, कोल्हापूर येथे पाठवावेत. याचा खाते क्र. ६००२५३१०२८० असून आयएफएससी कोड एमएएचबी ००००३२६ आहे. तरी, आपण सढळ हस्ते देणगी देऊन पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन जनकल्याण समिती, कोल्हापूरचे कार्यवाह विनायक कुलकर्णी (संपर्क : ९४२३८२५२४५) यांनी केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@