माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली एम्समध्ये दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना शुक्रवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. काही वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात हजेरी लावली.

 

गेल्या काही दिवसांपासून अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर नव्हती. शुक्रवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने सकाळी ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.  थकवा, श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आले होते .

@@AUTHORINFO_V1@@