अमेरिकेची पाकला तंबी : भारताला आक्रमकता दाखवण्यापेक्षा दहशतवादाविरोधात कारवाई करा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



वॉशिंग्टन : 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर एकप्रकारे अमेरिकेचे भारताला समर्थन मिळाले आहे. या कायद्यातील बदलानंतर पाकिस्तानने घेतलेल्या भूमिकेवर अमेरिकेने कडक इशारा दिला आहे. 'तुम्ही भारताविरोधात आक्रमक होण्यापेक्षा तुमच्या देशातील दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करा, सीमारेषेवरून घुसखोरांना मदत करणे थांबवा', असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकन हाऊस अफेअर्स कमेटी आणि सिनेट फॉर रिलेशन कमेटीने बुधवारी ही प्रतिक्रीया दिली.

 

यावेळी कलम ३७० रद्द करण्यावरील प्रतिक्रीया देताना सांगितले कि, "भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे काश्मिरमधील कलम रद्द करतानाच्या प्रक्रियेत तिथल्या स्थानिक लोकांचेही मत विचाऱात घेतला पाहीजे.", असे मतही यावेळी नोंदवण्यात आले. भारतातील लोकशाही आणि पारदर्शकता सर्वात जास्त असून जम्मू काश्मिरच्या प्रश्नावरही भारताकडून ती बाळगली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

पाकिस्तानमध्ये घबराट

पाकिस्तानात कलम ३७० हटवल्यानंतर भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी बुधवारी ब्रिटनचे पंतप्रधान बेरिस जॉनसन्स, सौदी अरबचे युवराज मुहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चेवेळी कलम ३७० हटवणे आणि जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा रद्द करणे असा आहे. भारताने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे इमरान खान यांनी जगभरातील नेत्यांशी संपर्क ठेवला आहे. सोमवारी मलेशियाचे पंतप्रधान महतिर मुहम्मद आणि तुर्कीचे राष्ट्रपती रीसेप तयिप एर्दोआन यांच्याशी चर्चा केली.

 

पाकचे परराष्ट्र मंत्र्यांचा चीन दौरा

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी कलम ३७० च्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाकिस्तान कलम ३७० हटवल्याने होणारे परिणाम जगासमोर मांडणार आहे. हा मुद्दा पाकिस्तानकड़ून संयुक्त राष्ट्रात उचलला जाण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@