मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरात दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



मुंबई : सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती अद्याप कायम असून हजारो नागरिक पूराच्या पाण्यात अडकले आहेत. बजावकार्याही सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर-सांगलीतील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरात दाखल झाले असून हेलिकॉप्टरद्वारे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आदी मंत्रीही उपस्थित आहेत.
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना फोन करत अलमट्टी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे. ५ लाख क्युसेक इतके पाणी धरणातून विसर्ग करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामुळे सांगली भागातील पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होणार असल्याची माहीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



 

कोल्हापूर-सांगलीत पुरस्थिती भीषण आहे, मदत कार्यही सुरू आहे. अद्यापही हजारो नागिरक पुरात अडकले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंगळवार रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत परिस्थीचा आढावा घेतला होता. पुरग्रस्त भागात अत्यावशक सोयी पुरवण्याचे प्रशासन यंत्रणेला निर्देश दिले होते. दरम्यान, पूरस्थिती गंभीर असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. दरम्यान मुख्यमंत्री आज पूरग्रस्त भागाची पाहणी करत असल्यामुळे धुळे- नंदुरबार येथील महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आली आहे.



 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकारतर्फे पुरग्रस्तांसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्रातील पूरस्थितीचा वेळोवेळी आढावा केंद्र सरकार घेत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.



 
 
@@AUTHORINFO_V1@@