येत्या १० तारखेला 'साहो' चा ट्रेलर प्रदर्शित होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



सुजीथ दिग्दर्शित साहो या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्रभास च्या चेहऱ्यावर स्पॉटलाईट असून त्याच्या चेहऱ्यावर एक तेज झळकत आहे. हे ब्लॅक अँड व्हाईट पोस्टर आज प्रदर्शित झाले असून या पोस्टरच्या माध्यमातून येत्या १० तारखेला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची आनंदाची बातमी देखील प्रेक्षकांना देण्यात आली आहे.


येत्या ३० ऑगस्टला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे दरम्यान आता १० तारखेला प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलर विषयी प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील काही चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनाच्या तारखा बदलल्या देखील आहेत. त्यामुळे आता हा चित्रपट तितका प्रभावी ठरतो का? चित्रपटाविषयी प्रेक्षकांचे काय मत बनते? आणि या सगळ्याचा बॉक्स ऑफिसच्या गणितावर काय परिणाम होतो या सर्वच गोष्टी पाहणे महत्वाचे असेल. साहो या चित्रपटात प्रभास बरोबरच श्रद्धा कपूर, चंकी पांडे, निल नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ यासारखी जबरदस्त स्टारकास्ट काम करणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@