पूरग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



३०३ जवानांकडून ३९ बोटींद्वारे मदत व बचाव कार्य


सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), प्रादेशिक सेना (टेरिटोरियल आर्मी), कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पथक, कोस्ट गार्डच्या पथकांना पाचारण करण्यात आले आहे. या १२ पथकांचे एकूण ३०३ जवान २९ बोटींद्वारे इस्लामपूर - वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यात बचाव कार्य करत आहेत. ही माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. याशिवाय महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या १० बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे.

 

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची ८ पथके कार्यरत असून एकूण २४ कार्यान्वित बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. या ८ पथकांतील २१९ जवान मिरज आणि पलूस तालुक्यात मदत व बचाव कार्य करत आहे. प्रादेशिक सेनेची २ पथके असून ३ कार्यान्वित बोटींद्वारे मिरज तालुक्यात ६६ जवान काम करत आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे १ पथक असून एका बोटीद्वारे इस्लामपूर तालुक्यात बचाव कार्य करत आहे. तर कोस्ट गार्डचेही १ पथक एका बोटीद्वारे १८ जवान पलूस तालुक्यात बचाव कार्य सुरू आहे.

@@AUTHORINFO_V1@@