'मिशन मंगल' चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



जगन शक्ती दिग्दर्शित आणि आर. बल्की लिखित
'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज या चित्रपटाचा नवीन ट्रेलर प्रदर्शित झाला. अक्षय कुमार बरोबर चित्रपटात काम करणाऱ्या विद्या बालन आणि तापसी यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांच्या भूमिकांची छोटीशी झलक प्रेक्षकांना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे.

जर तुम्ही अपयशी ठरलात तरी हार मानू नका कारण एफ.ए.आय.एल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग" हे डॉ कलाम यांचे वाक्य 'मिशन मंगल' च्या टीमचे ब्रीदवाक्य आहे. आपल्या देशातील काही असामान्य शास्त्रज्ञांची ही एक अविश्वसनीय कहाणी आहे ज्यांच्या प्रयत्नांनी भारत मंगळावर पोहोचला. समोर आलेल्या अडचणी व अपयशांवर मात करत हे मिशन भारताने फत्ते करून दाखवले. याच शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांची ही कहाणी आहे. ही मिशनमंगलची कहाणी आहे हा मेसेज या ट्रेलमधून प्रतीत होत आहे.

आर बाल्की यांनी ही कथा गुंफली असून चित्रपटाचे कला दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. अखेर 'मिशन मंगल' हा प्रवास अंतिम टप्प्यात आला असून चित्रपटाचे हे मिशन देखील चित्रपटकर्त्यांसाठी तितकेच मंगलमय ठरते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@