राष्ट्रीय आपत्तीप्रमाणेच कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना मदत : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



कोल्हापूर : आलमट्टी धरणात पाणी सोडण्यास कर्नाटक सरकारची मंजूरी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. तसेच, "ब्रह्मनाळ येथे झालेली दुर्घटना ही अतंत्य दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत केली जाईल." असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

 

"गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली असून येथील पूर्वपरिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आहे. तसेच, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल. पंजाब, गोवा, गुजरातवरून बचावपथके मागवली आहेत. एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या मदतीने पूरग्रस्तांची सुटका करण्यात येत असून अनेक ठिकांनी पूरग्रस्तांना एअरलिफ्टने बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

 

"कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात राष्ट्रीय आपत्तीच्या धर्तीवरच युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात येत असून योग्यवेळी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेऊ." असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. "कोल्हापुरात १८ गावांना पुराचा वेढा पडला असून या पुरामुळे २८ हजार लोक बाधित झाले आहेत. या पुरामुळे कोल्हापुरात चौघांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे ६७ हजार हेक्टर जमिनीवरील पीकांचे नुकसान झाले असून ऊसालाही धोका निर्माण झाला आहे." अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@