महापूर : सांगलीत बोट उलटून १४ जण बुडाले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |



सांगली : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि इतर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफतर्फे मोठ्या प्रमाणावर बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. मात्र, गुरुवारी बोट उलटून दुर्घटना घडली आहे.

 
 
 

सांगलीच्या ब्रह्मनाळमध्ये बचावकार्य सुरू असताना एका खासगी बोटत सुमारे २५ ते ३० जणांना घेऊन जात असताना ही बोट उलटल्याने बोटीतले सर्वजण पाण्यात बुडाले. यातल्या १४ जणांना वाचवण्यात यश आले मात्र, इतर १४ जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंतच्या शोधकार्यात नऊ मृतदेह सापडले आहेत. 



 

 
 
 

एनडीआरएफच्या जवानांनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, मात्र, अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बोटीत गरजेपेक्षा जास्त लोक चढल्यामुळेच बोट बुडाल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाने नागरिकांनी समजुतदारपणा दाखवत संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@