पश्चिम महाराष्ट्राला पुराचा फटका : कोल्हापूर, सातारा, सांगलीत जनजीवन विस्कळीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Aug-2019
Total Views |


सातारा : पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाने घातलेल्या धूमशानामुळे कोल्हापूर, सांगली परिसरात पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूरात मात्र, परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. साताऱ्यातील परिस्थिती नियंत्रणात येत असून लष्कर, नौदल आणि एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.


 

साताऱ्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. कोयना धरणाचे ६ दरवाजे सोळा फुटांवरून चौदा फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने परिस्थिती आटोक्यात येत आहे. पुराचे पाणी आता ओसरू लागल्याने सहा हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.



 
 

कराड आणि पाटणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने पूरात अडकलेल्यांना जेवण व आरोग्य सुविधा पुरवल्या आहेत. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.



 
 

सातारा जिल्ह्यातील ९० गावे पूरग्रस्त असून ५ गावांना दरडी कोसळण्याचा धोका आहे. कराडमधील ४ हजार २५८, पाटणच्या ७८६, फलटण तालुक्यातील ५४९, साताऱ्यातील ४६५, महाबळेश्वरमधील १६१ व जावलीतील ४३ अशा एकूण ६ हजार २६२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@