सुषमा स्वराज अनंतात विलीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री उशीरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव एम्स रुग्णालयातून भाजपच्या मुख्यालयामध्ये आणले होते. तिथे देशामधील सर्व नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सुषमा स्वराज यांचे पार्थिव दिल्लीतील लोधी रोड स्थित स्मशानभूमीत दाखल केले होते.

 

सुषमाजींना शासकीय इतमामात सुषमाजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्यांची मुलगी बासुरी यांनी त्यांना मुखाग्नी दिला. अखेर त्यांच्यावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार झाले. भारतीय राजकारणातील एक कणखर व्यक्तिमत्व अखेर अनंतात विलीन झाले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राहुल गांधी, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यासह विदेशातीलही विविध मान्यवरांनी सुषमा यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

 
@@AUTHORINFO_V1@@