सुषमा स्वराजांच्या जाण्यामुळे मोदी गहिवरले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |

 


 


आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या हितासाठी झटणाऱ्या संस्कृती
, सभ्यता, सौम्यता यांची प्रतिमा असलेल्या सुषमा स्वराज यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि संपूर्ण देशात दुःखाची लाटच पसरली. आज एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला. मात्र, त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम राहतील. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेल्या, त्यांचा हा प्रवास जवळून पाहिलेल्या अनेक दिग्गजांनी आज त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर अश्रू अनावर झाले. सरकार स्थापनेपासून पुन्हा एकदा बहुमताचे सरकार स्थापन करेपर्यंत मोदींच्या पाठीमागे असलेला खंबीर पाठिंबा त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत तुटून दिला नाही.

''सुषमा स्वराज यांचे निधन हे माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. भारतासाठी त्यांनी प्रेम भावनेने केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना कायम लक्षात ठेवले जाईल,'' असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त केली.

 

कालचा दिवस देशासाठी एका अर्थाने एक ऐतिहासिक दिवस ठरला. काल लोकसभेत कलम ३७० रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करून, ''याच दिवसाची मी आयुष्यभर वाट पाहात होते'' असे त्या म्हणत असताना कोणाला स्वप्नातदेखील वाटले नव्हते की, हे सुषमा स्वराज यांचे अखेरचे शब्द असतील.

@@AUTHORINFO_V1@@