सुषमा स्वराज यांना कवितेच्या माध्यमातून नेटकऱ्यांची श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 

सुषमा स्वराज अनंतात विलीन झाल्या असल्या तरीदेखील त्या भारतीयांच्या कायम स्मृतीत राहतील. भारतीय जनता पक्षाच्या खंद्या कार्यकर्त्या, कुशल संघटक, असामान्य वक्ता, निडर नेता आणि करारी बुद्धिमत्ता अशी कितीही विशेषणे लावली तरी त्यांचे वर्णन शब्दातीत आहे, अशा भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज. त्यांच्यावरील प्रेम शब्दात व्यक्त न होणारे आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलावे तेवढे थोडेच.


भारतवासीयांनी सुषमा स्वराज यांना आत्तापर्यंत प्रचंड मान दिला आणि यापुढेही असाच सन्मान त्यांना दिला जाईल. त्यांच्या आठवणीत नेटकऱ्यांनी कवितांमधून आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये प्रसिद्ध कलाकार, सामान्य नागरिक सर्वांचाच सहभाग आहे. त्यातील काही निवडक कविता सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

 


 
भाळी कुंकू, चेहऱ्यावर आश्वस्थणारे भाव,
आईसमान वाटे त्यांचे सुष "माॅं" ऐसे नाव ..
प्रमाण शब्द, खोल विचार, ओघवती ती वाणी
चारित्र्यवान , सात्विक , शीतल, स्त्री हिंदुस्थानी..
आनंदाच्या क्षणी तुम्ही का, निरोप आमचा घ्यावा..?
असे वाटते सवेच तुमच्या सांगावा हा द्यावा ..
बंधनमुक्त झाला काश्मीर, अन् अपुल्या हिमरांगा
सांगावा हा स्वर्गी जाऊन, अटलजींना सांगा..
तुम्ही दोघांनी, हिंदुस्थानी, जन्म पुन:श्च घ्यावा
राजकारणातले इमान, पुन्हा पुन्हा शिकवावा.
 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
"ऐसी भी क्या जल्दी थी
कुछ पल और ठहर जाती
रामलला के मंदीर जाकर
विजयी पताका लहराती
सिंचा था जिस बीजेपी को तुमने
वह कमल तन के खडा है
मंजील अब दूर नही
न मार्ग मे कोई रोडा है
स्वप्न होंगे पूरे सभी
जिनके लिए तुम रात रात जागी थी
पल दो पल ठहर जाती
तुम तो सबकी दुलारी थी।।"
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@