कोल्हापूरमधील पूरस्थिती गंभीर ; मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Aug-2019
Total Views |


 


मुंबई : "कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती गंभीर आहे. या ठिकाणी पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसेच पूरग्रस्त भागात यंत्रणांनी सतर्क राहावे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमधील महापुराचा आढावा घेतल्यानंतर सांगितले. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.

 

"कोल्हापूर आणि सांगलीमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. मिरज आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या पूर्ण गाड्या रद्द झाल्या आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावर ४ फूट पाणी होते. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. एनडीआरएफच्या पथक बचावकार्य राबवत आहे. कोल्हापूरची स्थिती अधिकच गंभीर असून त्या ठिकाणी ओदिशा आणि गुजरातमधून बचाव पथक बोलावले आहे." असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

"राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे, तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी." असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

@@AUTHORINFO_V1@@